Monday, 9 October 2017

Benifit of blod donet

                *【रक्तदानामुळे होणारे फायदे】*
____________________________________
1] रक्तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. रक्त प्राप्त करणार्या व्यक्तीलाच त्याचा लाभ होतो असे नाही तर रक्तदान करणार्यालाही अनेक बाबतीत फायदा होतो. रक्तदानामुळे तुमच्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते.
2] रक्तदानामुळे तुम्हाला तुमचा रक्तगट कळू शकतो. कारण रक्तदानाचे कार्ड दिले जाते. त्यावर हा रक्तगट लिहिलेला असतो.
3] रक्तदानामुळे मनुष्याचे हृदय आरोग्यपूर्ण बनते. कारण शरीरातील अतिरिक्त लवण (मीठ) रक्तदानाद्वारे निघून जाते.
4] रक्तदान करणार्यांना जे रक्तदाता कार्ड मिळते त्यामुळे तुम्हाला कधीही आपत्कालीन गरज पडल्यास रक्त मिळूं शकते. 
       
       रक्ताच्या एका बॅगेपासून लाल रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स) , रक्तकणिका (प्लेटलेट) आणि ताजा रक्तद्रव (फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा) असे वेगवेगळे घटक तयार होता. वेगवेगळ्या रुग्णांच्या गरजेनुसार त्यांना ब्लड बॅंकांमार्फत रक्ताचा पुरवठा केला जातो.
लाल रक्त पेशी (रेड ब्लड सेल्स)
विज्ञानामुळे हल्ली बरीच प्रगती झालेली आहे. त्यामुळे पूर्ण रक्त रुग्णाला देण्याची गरज काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. पूर्ण रक्त देण्याऐवजी केवळ लाल रक्तपेशी (पॅक्ड रेड ब्लड सेल), यात केवळ लाल पेशी असतात, रुग्णाला केवळ रक्तपेशी दिल्याने त्याच्या हृदयावर दाब येत नाही. तसंच यात इतर द्रवपदार्थ नसतो, तो आधीच वेगळा काढला जातो. जो इतर रुग्णांना उपयोगी पडतो. ऑपरेशन, थॅलसेमिया यामध्ये अशा पद्धतीनं रक्त दिलं जातं.
रक्तकणिका (प्लेटलेट)
डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, कर्करोग आदी आजारांच्या उपचारात प्लेटलेट देण्याची पद्धत आहे. यात बरेचदा रुग्णाला एकापेक्षा अधिक बॅग प्लेटलेट दिल्या जातात.
ताजा रक्तद्रव (फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा)
भाजलेले रुग्ण, रक्तास्रावाचा त्रास असणारे तसंच बाळंतपणातला रक्तस्राव या काही आजारांत या रक्ताची गरज भासते.

No comments:

Post a Comment

Thank you