Monday, 9 October 2017

Blod donate

   *【रक्तदान केल्यानंतर काळजी कशी घ्यावी】*
____________________________________
व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदानानंतर काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
■ रक्तदानानंतर कमीत कमी ४ तास धुम्रपान करू नये.
■ कमीत कमी २४ तासांपर्यंत कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये.
■ रक्तदानाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी घेणे.
■ रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जड वाहन चालवू नये व अति उष्ण ठिकाणी काम करणे टाळावे.
■ रक्तदानाच्या दिवशी भरगच्च पोटभरून जेवण करू नये. हलक्या स्वरूपाच्या पदार्थाचे सेवन करावे.
■ रक्तदानाच्या दिवशी गोड आणि मांसाहार अन्नाचे सेवन करू नये.
■ हातावर व शरीरावर जास्त ताण पडणारे खेळ टाळावे. उदा. क्रिकेट, व्यायाम, गिर्यारोहण, मैदानी खेळ, इ.
■ रक्त काढलेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असल्यास हात वर करून त्यावर दाब द्या.
■ रक्तदात्यास चक्कर अथवा अंधारी येत आहे असे वाटल्यास झोपावे व पायाखाली उशी ठेवावी. तसेच शिबीरातील डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा.
■ रक्तदानानंतर काही त्रास झाल्यास त्वरित रक्तपेढीच्या पत्त्यावर संपर्क करावा.
■रक्तदानादरम्यान आणि रक्तदानानंतर रक्तदात्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

            *【रक्तदान का करावे ? 】*
____________________________________
सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो. येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधी-कधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते. तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता. म्हणूनच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे . दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात

No comments:

Post a Comment

Thank you